सलमान खानने बांधली रश्मिका मंदान्नासोबत गुपचूप लग्नगाठ?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ४ जानेवारी २०२३ । बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच सलमान खान कधी लग्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नाची तारिख जाणून घेण्यासाठी संपुर्ण सिनेसृष्टी आणि त्याचा चाहतावर्ग उत्सुक आहे.

नुकताच दबंग खानने 57 वा वाढदिवस साजरा केला. त्याने अजून लग्न केलेलं नाही हे सर्वांनाच माहीत आहे. सलमानचे चाहते आणि कुटुंबीय त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, त्याच्या लग्नाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरतर दबंग खानने एका सुंदर अभिनेत्रीशी लग्न केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रश्मिका मंदान्नासोबतचा सलमानचा फोटो व्हायरल
सलमान खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दुसरी तिसरी कोणी नसून साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आहे. हे फोटो पुर्णपणे खोटे असून फोटोशॉप करण्यात आले आहे. यामध्ये दुसऱ्याच्या फोटोवर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो खोटा आहे
सलमान खान आणि अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोघंही हसताना दिसतायेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो पूर्णपणे फेक आहे. या फोटोमागील सत्य हे आहे की, त्यांचं लग्न झालेलं नाही.

व्हायरल फोटो पूर्णपणे खोटा आहे
हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. रश्मिका आणि सलमानच्या चाहत्यांना असा समज आहे की, या जोडीने गुपचूप लग्न केलं आहे, पण सत्य हे आहे की सलमान खान अजूनही बॅचलर आहे. रश्मिका आणि सलमानचा व्हायरल झालेला हा फोटो पूर्णपणे खोटा आहे, सध्या दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम