सनी देओलच्या ‘गदर-2’चा व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ४ जानेवारी २०२३ । बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील आयकॉनिक ‘हॅंड पंम्प’ सिन लोक आवर्जून पाहतात.

सोशल मीडियावर देखील या चित्रपटातील अनेक व्हिडिओ आजही व्हायरल होतात. या चित्रपटात सनी देओलसह अभिनेत्री अमिषा पटेलने मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान, या चित्रपटाचा सिक्‍वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गदर-2’ चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर ‘गदर-2’च्या शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, असाच एक व्हिडिओ झी स्टुडिओने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि मालिकांची झलक दाखवली आहे. 50 सेकंदांच्या या छोट्या व्हिडिओमध्ये ‘गदर-2’ मधील अभिनेता सनी देओलची ‘तारा सिंह’ची भूमिकाही दिसत आहे.

सनीने चित्रपटाच्या पहिल्या भागात ज्या पद्धतीने ‘हॅंड पंम्प’ उखडून टाकला होता. तोच स्वॅग सनीचा ‘गदर 2’ मध्येही दिसणार आहे. हा एक फुल ऑन अॅक्शन पॅक्ड चित्रपट असणार असणार आहे. आता प्रेक्षक सुद्धा ‘गदर 2’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग हिमाचल प्रदेश, लखनऊ आणि इंदूरमध्ये झाले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम