हॉलिवूड अभिनेता जेरेमी रेनर याचा अपघात

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । २ जानेवारी २०२३ । हॉलिवूड अभिनेता जेरेमी रेनर याचा नुकताच अपघात झाला. वीकेंडला स्नो पोइंग करताना त्यांचा अपघात झाला. जेरेमी हे अनेक प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटांचा भाग राहिलेले आहेत. जेरेमी यांनी अनेक ऍक्‍शन सिनेमे देखील केले आहेत.

मात्र खऱ्या आयुष्यात अपघत झाल्याने त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. सध्या जेरेमीला खूप त्रास झाला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ही घटना समोर आल्यापासून अभिनेत्याचे चाहते त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती दिल्याने चाहत्यांना काही अंशी बरे वाटले. हॉलिवूड रिपोर्ट्‌सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की,जेरेमी यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सोबत आहे. रविवारी रात्री स्नो पडत असताना हा अपघात झाला.

समोर आलेल्या माहिति नुसार या घटनेनंतर जेरेमीला एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्यावर योग्य वेळी उपचार सुरू झाले. जेरेमी हा हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्याला दोनदा ऑस्करसाठी नामांकनही मिळाले आहे. द हर्ट लॉकर आणि द टाऊन सारख्या चित्रपटांमध्ये अभिनयासाठी त्याला नामांकन मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताची बातमी समोर येताच फॅन्सची धाकधूक वाढली होती. मिशन इम्बोसिबल आणि मार्वल सिरींजमधील अभिनयामुळे अभिनेते जेरेमी यांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम