अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । २ जानेवारी २०२३ । अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेत आहे. कारण तिच्यासाठी 2022 हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. अशा परिस्थितीत मृणाल आणखी एका मोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
ती ‘नानी 30’ (Nani 30) मध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. ‘नानी 30’ तेलुगु चित्रपट दिग्दर्शक शौर्यव यांनी दिग्दर्शित केला आहे. मोहन चेरुकुरी , डॉ. विजेंदर रेड्डी तेगला आणि मूर्ति के.एस. यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटाला मल्याळम संगीतकार हे हेशम अब्दुल वहाब यांनी संगीतबद्ध केले आहे. https://youtu.be/ziPiMt4RENg ‘नानी 30’ चे फर्स्ट लूक पाहता असे लक्षात येत आहे की, हा एक इमोशनल फॅमिली ड्रामा असलेला चित्रपट आहे. नानीचे गेल्या वर्षी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये सुंदरनिकी आणि हिट: द सेकंड केस या चित्रपटांचा समावेश होता.

या चित्रपटांना चाहत्यांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. नानीच्या आगामी चित्रपटामध्ये ‘दसरा’ या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये नानीसोबत कीर्ती सुरेश देखील दिसणार आहे. यावर्षी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम