मलायका नव्या फोटोशूटमुळे झाली ट्रोल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ३ जानेवारी २०२३ । बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरशी असलेल्या तिच्या नातेसंबंधांमुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं.

 

या दोघांच्या वयात असलेल्या फरकामुळे अनेकदा सोशल मीडियावरून टीकही होताना दिसते. आता पुन्हा एकदा मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय.

मागच्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे बरीच चर्चेत होती. या शोमध्ये मलायकाने तिचे नातेसंबंध आणि खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

 

पण आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबरोबरचा रोमँटीक फोटो शेअर केल्याने तिला सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम