प्रेग्नन्सी काळातील अनुभवावर आलियाने केले भाष्य

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ३ जानेवारी २०२३ । बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल रणबीर कपूर व आलिया भट्ट काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. आलियाने नोव्हेंबर महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. कन्येच्या आगमनाने कपूर कुटुंबीय आनंदी होते. गरोदर असतानाही आलिया भट्ट चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रेग्नन्सी काळातील अनुभवावर भाष्य केलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, “माझी प्रेग्नन्सी ही अनपेक्षित होती. त्यामुळे माझं शरीर मला काय सांगत आहे, याकडे मी लक्ष देत होते. काम महत्त्वाचं होतं, पण त्यावेळी माझं बाळ आणि माझं स्वास्थ याला मी प्राधान्य दिलं. परंतु, सुदैवाने गरोदरपणात शारीरिक त्रासामुळे माझं काम मागे पडलं नाही. सुरुवातीच्या काही दिवसांत मला थकवा जाणवायचा, मळमळ व्हायची. पण तेव्हा मी याबाबत कोणाला काहीच बोलले नाही”.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम