नाना पाटेकर करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ३ जानेवारी २०२३ । विवेक अग्निहोत्रीने वॅक्सिन वॉरची घोषणा केली, तेव्हापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती.

 

आता द व्हॅक्सीन वॉरच्या कास्टिंगबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या आधी नाना 2018 मध्ये काला या चित्रपटात रजनीकांत यांच्या विरोधात दिसले होते.

 

त्यानंतर मोठ्या पडद्यापासून नाना पाटेकर काहीसे दूर होते. तर नोव्हेंबरमध्ये ‘तडका’ या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ते दिसले होते.यासोबतच अभिनेते अनुपम खेर देखील या चित्रपटात असणार असल्याचे समजते. याबाबतची एक पोस्ट देखील अनुपम खैर यांनी केली आहे.

अनुपम खैर यांच्या करिअरमधील 534 वा हा चित्रपट असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगूसह तब्बल दहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम