उर्मिला निंबाळकरचा बोल्ड लूक आला समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २९ डिसेंबर २०२२ I मराठमोळी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर सध्या चर्चेत आहे. उर्मिला प्रेग्नेंसीनंतर आता वेकेशनसाठी कुटुंबासमवेत एन्जॉय करताना दिसत आहे.

यावेळी तिने बोल्ड फोटोशूट देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

उर्मिला तिच्या यूट्यूब चॅनेल वरून लाखो प्रेक्षकांच्या मनात भरली आहे. तिने आजवर युट्युब वर ट्रॅव्हल, लाईफ स्टाईल, स्किन केअर ते अगदी रोजच्या आयुष्यातील खास टिप्स देखील ती देत असते. उर्मिलाने छोट्या पडद्यावर ‘दुहेरी’ मालिका साकारली होती. मात्र यानंतर तिने टेलिव्हिजन आणि सृष्टीकडे पाठ फिरवली. तरीही तिचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. अशातच तिच्या या बोल्ड फोटोजने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

या फोटोमध्ये उर्मिला खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. हॉलिवूडच्या अभिनेत्रीना ही टक्कर देईल असे तिचे आउटफिट्स आहेत. या आऊटफिट्समध्ये तिने बोल्ड पोझेस देत सर्वांचेच लक्ष वेधले. प्रेग्नेंसी नंतर उर्मिलाने स्वतःच्या शरीराकडे पुरेपूर लक्ष दिले आहे. ती एका मुलाची फिट आई देखील आहे. सध्या उर्मिलाचे फोटोज सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम