‘रकुल प्रीत’ बोल्ड अंदाजात आली समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २७ डिसेंबर २०२२ I हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.


त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.

मात्र, रकुलचा शेवटचा चित्रपट ‘थँक गॉड’ हा होता. त्यानंतर अभिनेत्रीचा अद्याप कोणताच चित्रपट रुपेरी पडद्यावर आला नाही. थँक गॉड या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंहसोबत अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत होते. दरम्यान, नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रीने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.कधी चित्रपटांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लूकमुळे ती चर्चेत येते. रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. यावेळी तिने तिच्या ख्रिसमस वीकेंडची झलक दाखवली आहे. ताज्या फोटोंमध्ये रकुलने पांढऱ्या रंगाचा सिल्कचा शॉर्ट ड्रेस परिधान केला असून, यामध्ये ती कमालीची मादक आणि हॉट दिसत आहे.

रकुलने तिच्या लुकला न्यूड चमकदार मेकअपने पूर्ण केले आहे. यासोबत तिने डायमंडचे कानातले कॅरी केले आहेत. सध्या तिचे हे नवीन फोटो सगळीकडे धुमाकूळ घालत असून, फॅन्सला देखील अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज आवडला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम