तुनिषा शर्माचं शिजानसोबत झालं होतं जोरदार भांडण

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २७ डिसेंबर २०२२ I एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या निधनाच्या एक दिवस आणि तुनिषा आणि शिजानचं जोरदार भांडण झालं होतं. हे भांडण इतकं वाढलं की दोन तास शूटिंग थांबवावं लागलं. अखेर प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिस दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा तपास करत आहेत.

चौकशीदरम्यान शिजानने तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे पोलिस कोठडीत शिजान खानने सांगितले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर मला खूप त्रास झाला आणि त्यामुळेच त्याने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांने सांगितले.

ब्रेकअपनंतर दोघांमध्ये काही ठीक नव्हते असे दिसते आणि त्यामुळेच तुनिषाने नाराज होऊन हे पाऊल उचलले. या वर्षी जूनमध्ये ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली होती. लडाख ट्रिपमध्ये त्यांच्यात जवळीक वाढली होती आणि ते एकमेकांना डेट करू लागले.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम