हिमांशी खुराना रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २७ डिसेंबर २०२२ I पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री तिच्या आगामी पंजाबी चित्रपटाचे शूटिंग करत होती.

यादरम्यान तिने रोमानियामध्ये उणे 7 डिग्री सेल्सिअस तापमानात शूटिंग केलं आणि ती आजारी पडली. यावेळी तिला मोठ्या प्रमाणात ताप आला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हि रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 13’ मधून प्रसिद्धीझोतात आली होती.


हिमांशी सध्या रोमानियामध्ये ‘फत्तों दे यार बडे ने’ या पंजाबी चित्रपटाच्या शुटींगसाठी गेली होती. या चित्रपटात हिमांशीसह इंदर चहल, निशा बानू यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, हिमांशीला ताप होता, पण तरीही ती शूटिंग करत होती. चित्रपटातील एका दृश्यासाठी तिला थंड पाण्यात शूट करायचं होतं. पण, तिची प्रकृती बिघडल्याने नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम