महागाई व कच्च्या तेलात झालेली वाढ यामुळे सोन्यात गुंतवणूक करावी का? तज्ञांचे मत बघा
डिजिटल मुंबई चौफेर। १३ फेब्रूवारी २०२२।
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेसमोर महागाई ही मोठी समस्या आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेतील महागाईने गेल्या चार दशकांचा विक्रम मोडला. तेथे महागाईचा दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला. वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. महागाई वाढल्यामुळे चलनाचे मूल्य कमी होते. यामुळे गुंतवणुकीच्या इतर मार्गांवरील निव्वळ परतावा कमी होतो. त्यामुळेच सोन्याकडे आकर्षण वाढते आणि त्याची किंमत वाढू लागते. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या उच्चांकावर $१८६० वर बंद झाला, तर MCX वर तो ४९ हजारांवर पोहोचला आहे.
चलनवाढीमुळे सोन्याची मागणी वाढत असून, त्यामुळे भाव वाढत असल्याचे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत $९५ च्या वर गेली आहे. या आठवड्यात कच्चे तेल $९५ वर बंद झाले. युक्रेन आणि रशियामधील तणाव वाढला तर कच्च्या तेलाची आणि महागाई वाढेल. यामुळे महागाई वाढेल, त्यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढतील.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम