सलमानच्या चित्रपटात असणार 10 अभिनेत्री

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २७ डिसेंबर २०२२ I चाहते बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. तसे तर अभिनेत्याचे अनेक चित्रपट येणार आहेत. पण अलीकडेच त्याच्या एका अशा चित्रपटाविषयी माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल दहा-दहा अभिनेत्री दिसणार असून, या चित्रपटाचे नाव आहे ‘नो एंट्री’.


या दिवसांत सलमान खानचे शेड्यूल पूर्णपणे टाइट आहे. अभिनेता सतत चित्रपटांसाठी शूटिंग करत असतात. नुकतेच त्याने ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली. आता त्याच्या आणखी एका चित्रपटाची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी बातमी येत आहे की, ‘नो एंट्री’चा सीक्वल येणार आहे, ज्याचे नाव ‘नो एंट्री में एंट्री’ असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात दहा अभिनेत्री असणार आहेत. मात्र, अद्याप या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम