कांतारा स्टार ऋषभ शेट्टीला रश्मिका मंदान्ना सोबत काम करण्याचीही इच्छा नाही

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २८ नोव्हेंबर २०२२ I अभिनेता ऋषभ शेट्टीने कंतारा या चित्रपटातून यशाचे नवे झेंडे रोवले आहेत. ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. कांतारा या ब्लॉकबस्टरनंतर ऋषभ शेट्टीची लोकप्रियताही खूप वाढली आहे.

ऋषभ शेट्टीने आता साथउ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाविषयी असे काही म्हटले आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

मला रश्मिका मंदान्नासोबत काम करण्यात रस नाही. ऋषभ शेट्टीला त्याच्या एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी त्याला समंथा रुथ प्रभू, रश्मिका मंदान्ना, कीर्ती सुरेश आणि सई पल्लवीसोबत काम करायला आवडेल? या प्रश्नावर त्याने उत्तर दिले- मी माझी स्क्रिप्ट पूर्ण केल्यानंतरच कलाकार निवडतो. नवोदितांसोबत काम करण्याला मी जास्त महत्त्व देतो, कारण त्यांच्यात कुठलाही अडथळा नसतो. मला हे कलाकार आवडत नाहीत.

कोणत्याही अभिनेत्रीचे नाव न घेता ऋषभ शेट्टी म्हणाला, ‘मला ती आवडत नाही पण मला सई पल्लवी आणि समंथा यांचे काम आवडते. आता ऋषभ शेट्टीचं असं म्हणणं काय आहे हे तोच सांगू शकतो, पण रश्मिका मंदान्नासोबत काम करण्यात त्याला रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम