पुष्पा : द राइज’ होणार रशियात स्क्रिनींग

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २८ नोव्हेंबर २०२२ I १ ते ६ डिसेंबर दरम्यान, भारतीय चित्रपट महोत्सवाचा पाचवा वर्धापन दिन रशियातील शहरांमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट कंपनी इंडियन फिल्म्सद्वारा केले जाणार आहे.

मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोची अशा अनेक शहरांमध्ये स्क्रीनिंगचे आयोजन केले जाईल. या महोत्सवाची सुरुवात ‘पुष्पा’ या जबरदस्त चित्रपटाच्या स्क्रिनींगने होणार आहे.

या कार्यक्रमात करण जोहरच्या ड्रामासह भारतीय चित्रपटसृष्टीतील हिट चित्रपटांचा समावेश असून, यामध्ये रशियात सर्वात जास्त आवडला जाणारा म्यूजिकल मेलोड्रामा चित्रपट ‘डिस्को डान्सर’चा देखील समावेश आहे. भारतीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ डिसेंबर रोजी मॉस्को येथील “ओशनिया” शॉपिंग सेंटर येथे होईल. तसेच, डिसेंबर रोजी ‘पुष्पा: द राइज’चे सर्व कलाकार आणि क्रू सदस्य सेंट पीटर्सबर्ग येथील “गॅलेरिया” शॉपिंग सेंटर येथे चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम