नराधम बाप, आजोबा, चुलता यांच्याकडून मुलीवर अत्याचार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १७ नोव्हेंबर २०२२ | पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून आजोबा, चुलता आणि वडिलांकडून 17 वर्षीय मुलीवर २ वर्ष लैंगिक अत्याचार (केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला आहे. या प्रकरणी 49 वर्षीय वडिलांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. घरात परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवलं होतं. 2016 ते 18 ही दोन वर्ष मुली उत्तर प्रदेशात रहायला होती. याच दरम्यान 33 वर्षीय चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर किमान वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिच्या आजोबांनी देखील तिचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. त्यानंतर 2018 मध्ये ती मुलगी पुण्यात आली. त्यावेळी आईवडिलांना तिने पत्र लिहून हा प्रकार कळवला होता. मात्र त्यानंतर वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आई काही कारणास्तव बाहेर गेली असता वडील तिच्यावर अत्याचार करायचे, असं पीडितेनं समुपदेशादरम्यान सांगितलं.

यापूर्वीदेखील समुपदेशनाच्या वर्गातून धक्कादायक प्रकार समोर आला होता. सात वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलीवर ओळखीच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले होते. समुपदेशनासाठी शाळेत गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित मुलीची चौकशी केली होती. त्यानंतर तिने तिसरीत असताना सात वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम