‘मॉस्को फॉर्मेट कंस्लटेशन ऑन अफगानिस्तान’ बैठकीत भारताचा सहभाग

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १७ नोव्हेंबर २०२२ | रशियाची राजधानी मॉस्को या ठिकाणी ‘मॉस्को फॉर्मेट कंस्लटेशन ऑन अफगानिस्तान’ बैठक होत आहे. या बैठकीत भारताने देखील सहभाग नोंदवला आहे. बुधवारी झालेल्या या बैठकीत भारताकडून पाकिस्तान-इराण-अफगाणिस्तान डिवीजनचे संयुक्त सचिव जे पी सिंह यांनी सहभाग नोंदवला. या बैठकीला रशिया, कजाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, चीन, पाकिस्तान, इराण आणि तुर्कमेनिस्तानने देखील सहभाग नोंदवला होता.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेया बैठकीत अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती आणि त्याच्यासोबत निपटण्यासाठी मानवीय मदत महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. या बैठकीत यंदा भारताला विशेष महत्त्व दिलं गेलं. कारण याआधी अफगाणिस्तानबाबत झालेल्या बैठकीत भारताला आमंत्रित केलं जात नव्हतं.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम