श्रिया पिळगावकर साकारणार सेक्स वर्करची भूमिका

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १५ डिसेंबर २०२२ I मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांची एकुलती एक लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने आत्तापर्यंत बऱ्याच वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. यापूर्वी ‘गिल्टी माइंड्स’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ सारख्या वेबसीरिजमध्ये उत्तम भूमिका साकारल्यानंतर श्रिया आता तिच्या आगामी वेबसीरिजमध्ये सेक्स वर्करची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या वेबसीरिजचं नाव ताजा खबर असून ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून येत्या 6 जानेवारीला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रिया पहिल्यांदा अशाप्रकारची भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजमध्ये श्रियाच्या पात्राचे नाव मधु असून ती एक सेक्स वर्कर असते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम