गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत या आहेत मॉडेल,अभिनेत्रीचा समावेश

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १५ डिसेंबर २०२२ I 2022 मधील डिसेंबर महिना सुरु झाला आहे. येत्या काही दिवसात नव्या वर्षाची सुरुवात होईल. अशातच आता या वर्षी गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाची लिस्ट समोर आली आहे.

या लिस्टमध्ये आशिया खंडातील 2022 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या 100 नावांचा समावेश आहे. 2022 मध्ये आशिया खंडातील या यादीमध्ये भारतातील अनेक अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. यात अभिनेत्री कतरिना कैफपासून उर्फी जावेदपर्यंत बऱ्याच अभिनेत्रींचा समावेश आहे.
https://twitter.com/movieherald/status/1602691996434731008/photo/1
2022 मध्ये अनुष्का शर्मा आणि जान्हवी कपूरपेक्षा उर्फीला केलं सर्वाधिक सर्च

‘मोस्ट सर्च एशियन 2022’च्या या यादीमध्ये भारतातील अभिनेत्री कतरिना कैफ चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा (10), करीना कपूर (11), काजल अग्रवाल (13), दीपिका पादुकोण (26), नयनतारा (33) , श्रद्धा कपूर (40), उर्फी जावेद 43 व्या क्रमांकारवर असून अनुष्का शर्मा (50), जाह्नवी कपूर (65), जॅकलीन फर्नांडिस, अनुष्का शेट्टी (47), सोनाक्षी सिन्हा (53), पूजा हेगड़े (56), शिल्पा शेट्टी (59), कियारा आडवाणी (60), कृति सेनन (85), सारा अली खान (88), दिशा पटानी (90) यांचा समावेश आहे. अशाप्रकारे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींना उर्फीने मागे टाकलं आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम