दिशाने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ
मुंबई चौफेर I १५ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिशा चाहत्यांच्या संपर्कात राहते. दिशा गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. त्यानंतर आता दिशा तिचा मित्र अलेक्झांडर ऍलेक्स सोबत दिसली. त्या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, दिशानं अॅलेक्झॅन्डरसोबत बाथरुममधला जो व्हिडीओ शेअर केला तो पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
दिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. दिशा पटानीनं शेअर केलेल्या व्हिडीओत ते दोघे बाथरुममध्ये डान्स करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत दिशा आणि अॅलेक्झॅन्डर कॅमेऱ्यासमोर दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडला एक गाण प्ले होत असून अॅलेक्झॅन्डर सतत त्याच्या हातानं हार्ट बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिशा आणि अॅलेक्झॅन्डर यांनी बाथरोब परिधान केले आहेत. तर दोघांनी डोक्यावर टॉवेल गुंडाळला आहे. दोघेही बाथरूममध्ये एकत्र नाचत आहेत आणि दिशा सुद्धा मध्येच ट्वर्क करत आहे. अॅलेक्झॅन्डर आणि दिशा यांनी शॅम्पूच्या बाटल्यांचा वापर माइक म्हणून केला आहे. अॅलेक्झॅन्डरसमोर दिशाचा हॉट डान्स पाहून चाहते हैराण झाले आहेत.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम