साथिया’ फेम ‘गोपी बहू’ लग्नबंधनात

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १५ डिसेंबर २०२२ I ‘गोपी बहू’ नावाने प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने नुकतंच शाहनवाज शेख याच्या सोबत लग्लबंधनात अडकली आहे. तिने अचानकच लग्न करुन चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. एक दिवसापूर्वीच तिचे हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते मात्र, तेव्हा तिच्या भावाचं लग्नाचा आनंद लुटत आहे असे सांगितले होते मात्र, तिच्या अचानक लग्नाने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.


‘साथ निभाना साथिया’ फेम ‘गोपी बहू’ लग्नबंधनात अडकली आहे. तिने गुपचुप लग्न सोहळा उरकला असून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक दिवसापूर्वीच तिचे हळदीचे फोटो तुफान व्हायरल झाले होते, तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की, देवोलिना लग्न करत आहे का? आता मात्र, या प्रश्नाचे अनेक पुरावे समोर आले आहे म्हणजेच अभिनेत्रीने खरच तिचा बॉयफ्रेंड जिम ट्रेनर शाहनवाज शेख याच्या सोबत विवाह सोहळा उरकला आहे.

दोवोलिना भट्टाचार्जी हिने आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवरुन लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यासोबतच अभिनेत्रीचा लग्नानंतर कंगन खेळाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये देवोलिना तिचा पती म्हणजेच शाहनवाजला चांगलीच टक्कर देताना दिसून येत आहे. कंगन ओढाओढीच्य कार्यक्रमामध्ये जिंकते ज्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला दिसून येत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम