टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल ;नितीन गडकरींची घोषणा!

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १४ नोव्हेंबर २०२२ | गेल्या काही दिवसापासून त्यांनी टोल टॅक्स संदर्भातही मोठे निर्णय घेतले आहेत. गेल्या वर्षीपासून देशभरात टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर सुरू केला आहे. आता पुन्हा टोल टॅक्स मध्ये बदल करण्यात आला आहे.महामार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्यांना टोल भरावा लागतो. आता केंद्र सरकार टॅक्सच्या नियमात बदल करणार आहे. टोल टॅक्स संदर्भात एक विधेयक मांडले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. टोल टॅक्स न भरणाऱ्यांसाठी कोणत्याही शिक्षेची तरतुद नाही. तर आता टोल भरण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

“आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही, मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स कापला जाईल. त्यासाठी पद्धत सुरू केली जाणार नाही, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम