तमन्नाने केला इंटिमेट सिन करतानाचा खुलासा

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २८ डिसेंबर २०२२ I अभिनेत्री तमन्ना भाटिया साऊथसह बॉलिवूडमध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे. साऊथचे दिग्दर्शक तर तमन्नाला ‘लकी अभिनेत्री’ मानतात कारण तमन्नाने काम केलेला हर एक साऊथ सिनेमा हिट ठरला आहे.


म्हणूनच चाहते देखील तमन्नाला भरभरून प्रेम देतात. नुकतंच तमन्नाने एका मुलाखतीदरम्यान आपल्या इंटिमेट सिनबाबत खुलासा केला आहे.

दिसायला सुंदर,उत्तम डान्स, चांगला अभिनय यासोबतच तमन्ना कथेच्या गरजेनुसार अनेकदा बोल्ड सिन देताना देखील दिसते. नुकतंच तिनं इंटिमेट सिन देताना कलाकाराच्या काय भावना असतात याबाबत खुलासा केला. इंटिमेट सिन करताना अनेकदा सहकलाकाराला काय वाटेल याचा जास्त विचार करतात. तमन्ना म्हणते,”अभिनेता पुरुष किंवा स्त्री आहे असा विचार न करता तो फक्त मानव आहे हे लक्षात घेण्याची गरज असते”.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम