सारा अली खानने केला लोकल प्रवास ..

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १० डिसेंबर २०२२ I सारा अली खान आपल्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. काँट्रव्हर्सीपासून सारा नेहमीच लांब राहते. परंतु तरी देखील तिच्या नावाची सतत चर्चा असते. चित्रपटांमध्ये हटके रोल करणारी सारा खऱ्या आयुष्यात देखील कधी कधी सर्वांना आपला हटके अंदाज दाखवते. नुकतच चाहत्यांना तिच्या या अंदाजाचा प्रत्येय आला. साराने खचाखच गर्दीने भरलेल्या मुंबईतील लोकलने प्रवास केलाय.

फक्त लोकलने प्रवास करून सारा थांबली नाही तर तिने यादरम्यान गर्दीतून व्हिडीओ देखील शूट करत आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओपाहून सर्वजण थक्क झाले आहेत. यावेळी सारासोबत तिचे मित्र देखील असल्याचे दिसून येते. मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी आम्ही लोकलने जात असल्याचं यावेळी साराने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम