इंडो-इटालियन चित्रपटात चित्रांगदा मुख्य भूमिकेत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २० डिसेंबर २०२२ I दिग्दर्शक गौतम घोष यांच्या आगामी इंडो-इटालियन चित्रपटात चित्रांगदा मुख्य भूमिकेत आहे. यात तिच्या जोडीला इटलीतील दिग्गज अभिनेते मार्कोडो लियोनार्डी आहेत. यानिमित्ताने चित्रांगदा प्रथमच इटालियन अभिनेत्यासोबत काम करत आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती; पण महामारीनं वाट अडवल्यानं शूट पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

याचा एक मोठा भाग मुंबई आणि जबलपूरमध्ये शूट केला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला आहे. यात चित्रांगदाचं डी-ग्लॅम रूप पाहायला मिळतं, जे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणारं ठरत आहे. या पोस्टरवर कमीत कमी मेकअप केलेली ऑरेंज रंगाच्या साडीतील चित्रांगदा लक्ष वेधून घेते. या चित्रपटाची पटकथा गौतम यांनी जगन्नाथ गुहा यांच्या साथीनं लिहिली आहे. याशिवाय एमेडियो पगनीनी आणि सर्जियो स्कैपग्निनी या इटालियन लेखकांनीही यावर काम केलं आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम