धक्कादायक : चार तरुणींनी तरुणाचे अपहरण करून केला अत्याचार
मुंबई चौफेर | २३ नोव्हेंबर २०२२ | जालंधरमधून अपहरण आणि लैंगिक छळाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जालंधरमधील एका चामड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीने चार तरुणींनी दारू पाजून त्याच्यावर अत्याचारकेल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.
पीडित व्यक्तीने सांगितले की, तो जालंधरच्या कपूरथला रोडवर असलेल्या एका लेदर फॅक्टरीत काम करतो. तो घरी जात होता, यादरम्यान एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्यात 4 मुली बसल्या होत्या, त्यांनी डोळ्यात कुठलातरी पदार्थ घातला आणि गाडीत ओढले. मुलींनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, हात बांधले आणि दारू पाजली.
चारही मुली दारूच्या नशेत असल्याचे तरुणाने सांगितले. त्यांनी त्याला अज्ञात ठिकाणी नेले आणि त्यालाही जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर तो दारूच्या नशेत असताना तरुणींनी त्याच्यावर अतिप्रसंग केला. सर्वकाही झाल्यानंतर गाडीतून त्याला परत फॅक्टरीसमोर सोडले आणि पळ काढला. चेहऱ्यावरुन तरुणी चांगल्या घरातील असल्याचेही त्या तरुणाने सांगितले आहे. अद्याप याप्रकरणी त्याने तक्रार दाखल केलेली नाही. तरुणाकडून माहिती घेऊन गुप्तचर विभाग तपास करत आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम