‘कुत्ते’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २० डिसेंबर २०२२ I अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह स्टारर बहुचर्चित ‘कुत्ते’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या हटके शीर्षकामुळे त्याबद्दलची उत्कंठा वाढली होती. डार्क ह्युमरने भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये सात ग्रे-शेडेड पात्र दिसत आहेत.

‘एक हड्डी और सात तुकडे’ अशी ‘कुत्ते’ या चित्रपटाची टॅगलाईन आहे. हा चित्रपट सात लोकांच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. सात जण एका गोष्टीची प्रतीक्षा करत आहेत. आता ती गोष्ट नक्की काय आहे हे प्रेक्षकांना चित्रपटातच कळेल.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम