शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन – परमहंस आचार्य

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २१ डिसेंबर २०२२ I गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा वाद चिघळताना दिसत आहे.

अनेकांनी अभिनेत्रीच्या भगव्या बिकिनीवर तिव्र संताप व्यक्त केला आहे. ‘पठाण’ सिनेमात बेशरम रंग गाण्यात दीपिकाने घातलेल्या बीकिनीमुळे अभिनेत्री सर्वत्र ट्रोल होत आहे. वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिला शाहरुख खानला धमकी दिली आहे.

शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी वादग्रस्त धमकी देण्यात आलीय. अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी ही वादग्रस्त धमकी दिलीय. पठाण सिनेमातल्या दीपिकाच्या भगव्या बिकिनीचा वाद काही थांबताना दिसत नाही.. या सिनेमातल्या बेशरम रंग गाण्यात दीपिकाने भगवी बिकीनी घालत भगव्या रंगाचा अपमान केल्याचा आरोप आहे.

आता परमहंस आचार्य यांनी शाहरुख खानलाच धमकी दिलीय. आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले. जर मला जिहादी शाहरुख खान मिळाला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन अशी वादग्रस्त धमकी परमहंस यांनी दिलीय. एवढंच नाही, तर ही एक रणनीती असून हिंदूंच्या भावना आणि पैसे कमविण्याचा धंदा असल्याचा आरोप देखील परमहंस आचार्य यांनी किंग खानवर केला आहे.

दरम्यान पठाण सिनेमातीलील बेशरम रंग या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घालणे दीपिकाला चांगलंच महागात पडलं. यावर भाजपसह अनेक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे.

भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम