मुलानेच उडवली मलायकाच्या स्टायलिश कपड्यांची खिल्ली

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २१ डिसेंबर २०२२ I बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सतत आपल्या स्टाइलमुळे आणि वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याने अनेक चाहत्यांना भुरळ पाडते तर अनेकदा तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोलही केले जाते. त्याशिवया सतत तिला तिचा बॉफ्रेंड अर्जुन कपूरयाच्यामुळे देखिल ट्रोल केलं जातं मात्र, यावेळेस स्वत: अभिनेत्रीच्या मुलाने तिला कपड्यांमुळे नावं ठेवली आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि फॅशेनमुळे सतत ओळखली जाते. वयाची 45 वी पार केली आहे तरी मॉडेलिंग असो वा फिगर मेंटेन यमध्ये ती तरुन अभिनेत्रींना मागे सोडते. सध्या अभिनेत्री तिचा नवीन शो ‘मूव्हींग इन विथ मलायका’कार्यक्रमामुळे खूपच चर्चेत असते मात्र, एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीचा मुलगा अरहान खानयाने शोमध्ये हजेरी लावली असून मलायकाच्या स्टाइलिश कपड्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

मूव्हींग इन विथ मलायका या कार्यक्रमाच्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये मलायका तिचा मुलगा म्हणजे अरहान खान याच्या सोबत शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी मलायकाने ग्लॅमरस टॉप परिधान केला होता. मात्र, याच टॉपवरुन अरहानने त्याची आई म्हणजेच मलायकाची मस्करी केली. त्याने आईच्या कपड्यांची तुलाना टेबल नॅपकिनशी केली तो म्हणाला की, “तू जेलमध्ये कैदीसारखी दिसत आहेस.” हे एकूण मलायकाला हसू अनावर होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम