आलिया भट्चा ग्लॅमरस लूक आला समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । १ जानेवारी २०२३ । बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या मुलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहे. यासोबतच आलिया तिचे नवीन फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच अभिनेत्रीने आई झाल्यानंतरचा एक ग्लॅमरस लूकमधील पहिला फोटो शेअर केला आहे.

ज्यामध्ये ती खूपचं सुंदर दिसत आहे.

आलिया भट्टचा हा क्लासी लूक तिच्या चाहत्यांनाही खूपच आवडला आहे, चाहते तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोंवर चाहते सतत कमेंट करताना दिसत आहेत.

आलियाच्या या नव्या फोटोंमध्ये ती एकदम फिट अँड कूल दिसतेय. आलिया प्रेग्नेंसीनंतर पहिल्यांदाच अशा फिट अँड फाईन अंदाजात समोर आली आहे. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने आपल्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. राहा जन्मापासूचं सतत चर्चेत आली आहे.


मात्र राहाच्या जन्मापासून आई आलियाच्या चेहऱ्यावर एक मातृत्वाची चमक यला मिळतेय. आलिया सध्या मुलीसोबत क्लालिटी टाइम स्पेंड करताना तिचे अनेत फोटोही शेअर करताना दिसते. वडील झाल्यानंतर रणबीर कपूरही खूप आनंदी दिसत आहे. एकूण राहाच्या जन्मापासून कपूर कुटुंबियांमध्ये एक आनंदाचे, चैतन्याचे वातावरण दिसत आहे.

दरम्यान राहाच्या जन्मानंतर आलियाला एवढे फिट पाहून तिचे चाहते आनंदित झाले आहे. तिच्या नव्या लूकमधील आऊटफिटही आता तेवढाच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण आलिया यापूर्वी अनंत अंबानी यांच्या पार्टीला हा ड्रेस घालून हजेरी लावली होती. ज्यामध्ये अनेकांनी तिची प्रशंसा केली होती. त्यावेळीही तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम