हुमा कुरेशींचा धक्कादायक खुलासा

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । १ जानेवारी २०२३ । बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हुमा कुरेशी सध्या तिच्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

दरम्यान, हुमानं 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘बदलापूर’ या चित्रपटातील अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली होती. या चित्रपटात अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटाविषयी हुमानं एक धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रपटातील बलात्काराचा सीन शूट केल्यानंतर तिच्यावर त्याचा कसा परिणाम झाला याविषयी तिनं सांगितले आहे.
https://www.instagram.com/iamhumaq/?hl=en
श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘बदलापूर’ या चित्रपटातील अभिनयाविषयी हुमानं प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली. या चित्रपटात हुमानं सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. अलीकडेच, एका मुलाखतीत हुमानं चित्रपटाशी संबंधित एका सीनविषयी सांगितले. यावेळी हुमानं सांगितले की, बलात्काराचा सीन शूट केल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसला.

एका मुलाखतीत हुमा कुरेशीने सांगितले की या चित्रपटात तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. तिनं हे पात्र केले कारण लोकांना सेक्स वर्करबद्दल आणि त्यांचा आयुष्याबद्दल प्रेक्षकांना कळणं महत्त्वाचे होते. कारण लोक त्यांना अगदी सहजपने जज करतात आणि त्यांच्यावर बलात्कार केला जाऊ शकत नाही अशी लोकांची समज असते.

‘शूटिंग झाल्यानंतर जेव्हा ती तिच्या रूममध्ये परत जायची तेव्हा तिच्या अंगावर सगळे कपडे असायचे, आणि तिला माहित होतं की जे झालं ते सगळं स्किप्टेड होते. परंतु जेव्हा ती घरी परतायची तेव्हा तिचे हात थरथरायचे,’ असे हुमानं मुलाखतीत सांगितले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम