ग्लोबल मार्केट मधील उद्योगाच्या संधीरोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे चर्चासत्र

ग्लोबल मार्केट मधील उद्योगाच्या संधीरोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे चर्चासत्र https://wp.me/pdHzYz-mV

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर| ४ एप्रिल २०२२| जळगाव ः रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी तर्फे ग्लोबल मार्केट अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग व्यवसायाच्या संधी या विषयावर चर्चासत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्रात विनले पॉलीमर्स प्रा. लि.चे संचालक प्रमोद संचेती यांनी २३ वर्षातील अनुभव सांगत आफ्रिकेतील स्वतःच्या उद्योगाची माहिती सांगून तिथे छोटा व्यवसाय मोठा कसा करु शकतो हे सांगितले.
भूमी रिसोर्सस लि. टाझांनियाचे संचालक वेदांत मोहता यांनी रेवंडा व टांझानिया या देशातील स्वतःच्या व्यवसायाच्या वाटचालीची माहिती दिली. सावरिया फ्युचरवर्कस लि.चे.संचालक रमण अग्रवाल यांनी न्युयॉर्क व दुबई मधील त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली.
सर्वच वक्त्यांनी विदेशातील उद्योग व्यवसायासाठीच्या संधी, नफा-तोटा, वातावरण, बाजारपेठ, योजना याविषयी माहिती देऊन त्यासाठीची प्रक्रिया, घ्यावयाची काळजी, तेथे कोणत्या व्यवसायास वाव आहे, तेथे जाण्यासाठी कोण कोण मदत करु शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या सध्याचे धोरण देखील यासाठी अनुकूल असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी गोल्डसिटीचे अध्यक्ष उमंग मेहता यांची उपस्थिती होती. आभार मानद सचिव डॉ.नीरज अग्रवाल यांनी मानले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम