झुलैलाल जयंतीनिमित्त निघालेल्या षोभायात्रेचे सानंदांनी केले स्वागत

झुलैलाल जयंतीनिमित्त निघालेल्या षोभायात्रेचे सानंदांनी केले स्वागत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर| ४ एप्रिल २०२२| झुलैलाल जयंतीनिमित्त षनिवार दि.२ एप्रिल २०२२ रोजी आठवडी बाजार येथे श्री गुरुनानक देवजी मंदिर येथुन सिंधी समाज बांधवांच्या वतीने आकर्शक रथामध्ये भगवान झुलैलाल यांच्या पुतळयाची भव्य षोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये पुज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष हिरानंद नथ्थाणी,नरेष नागवाणी,यष भागदेवाणी यांच्यासह सिंधी समाज बांधव भगिणी मोठया संख्येने सहभागी झाले होते. या षोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. ही षोभायात्रा एकबोटे चौक येथे आली असता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांनी भगवान झुलेलाल यांच्या पुतळयाला हारार्पण करुन पालखीचे दर्षन घेतले.यावेळी महिला कॉंग्रेस कमिटीच्या षहरअध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,वर्शाताई इंगोले, युवक कॉंग्रेसचे तुशार चंदेल, नाना रिंढे,अमर पिंपळेकर,अतुल संत,षषिकांत इंगळे, प्रताप कदम, बंटी मोरजाणी,महेष मोरजाणी, अमित नागराणी, प्रकाष खेमानी यांच्यासह सिंधी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी श्री झुलेलाल जयंतीनिमित्त समस्त सिंधी समाज बांधवांना षुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम