भेडिया ची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २७ नोव्हेंबर २०२२ I वरूण धवन आणि क्रिती सॅनॉन यांचा क्रिएचर कॉमेडी चित्रपट भेडिया आजकाल थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात वरुणला वेअरवॉल्फमध्ये रूपांतरित होताना पाहण्याची प्रेक्षकांची आवड वाढत आहे, म्हणूनच भेडियाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाला टक्कर दिली असून, दुसऱ्या दिवशी जगभरात १४.६० कोटींची कमाई केली आहे

भेडियाने पहिल्या दिवशी जगभरात १२.०६ कोटी कमावले, तर दुसऱ्या दिवशी जगभरात १४.६० कोटींची कमाई करत चित्रपटाने २६.६६ कोटींची कमाई केली आहे. रविवारी यासाठी कमाई करणे खूप महत्वाचे आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. भेडिया, हळुहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम