बिपाशाने केले व्हिडीओ शेअर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । १ जानेवारी २०२३ । 2022 हे वर्ष अनेक सेलिब्रिटींसाठी खास आणि चांगले होते. एकीकडे आलिया-रणबीर, अली फजल-रिचा चढ्ढा यांच्यासह अनेक सेलेब्सचे लग्न झाले. तर दुसरीकडे नव्या छोट्या पाहुण्याने काहींच्या घरी आगमन केले.

बिपाशा बासू ग्रोव्हर या सेलिब्रिटींपैकी एक आहे. बिपाशाने नोव्हेंबर 2022 मध्ये एका सुंदर मुलीला जन्म दिला.बापाशाने मुलगी देवीसोबतची एक व्हिडिओ क्लिप शेअर करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


बिपाशाने तिच्या इन्स्टा स्टोरीद्वारे एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलीसोबत दिसून येते. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की 2022 हे वर्ष जादुई वर्ष ठरले आहे कारण या वर्षाने मला आयुष्यातील सर्वात सुंदर भेट असलेला आनंदाचा खजिना अर्थात तिची मुलगी ‘देवी’ दिली. असं म्हणत तिने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बिपाशा बसूने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती करण सिंग ग्रोवर आणि मुलगी देवीसोबत दिसत आहे. मात्र, देवीचा चेहरा इमोजीने झाकलेला आहे. हा फोटो व्हिडिओ आहे

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम