किरीट सोमय्यांचे धक्कादायक वक्तव्य, संजय राऊत यांनी १०० कोटींचा घोटाळा केलाय

बातमी शेअर करा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत त्यांचे कुटुंबीय आणि आणखी काही संबंधीत लोकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक आरोप आता किरीट सोमय्यांनी केले आहेत

संजय राऊत यांच्या मित्र परिवारने 100 कोटींचा जंबो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप आता सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्याशी संबंधीत असलेले भागिदार सुजीत पाटकर यांची बनावट, कागदी कंपनी असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिसेस, दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड कोविड सेंटर्सचे कंत्राट अशा वेगवेगळ्या ठिकाणी घोटाळे झाल्याचे त्यांनी आरोप केले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA ला चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. यापूर्वी संजय राऊत यांचे जवळचे असलेले उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडी ने मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल करत अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्यावर 1 हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या नातेवाईकांवर एकामागून एक चौकशी होत असताना आता राऊतांकडून नेमकं काय प्रत्युत्तर येत हे पाहावे लागेल.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम