पुण्यात भाजपला बसणार चांगलाच दणका…एकामागोमाग एक भाजप नेते राष्ट्रवादीत!
राष्ट्रवादीच्या सुत्रांनी भाजपचे वीस ते पंचवीस नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.येत्या काही दिवसातच पुणे महानगरपालिकेची निवडणूका लढवण्यात येणार आहे. निवडणूका जवळ आल्या की नेत्यांची संगीत खुर्ची सुरू होते. तसेच यंदाच्या महापालिकेच्या निवडणूकेच्या पार्श्वभूमीवर पक्षबदल करण्यास सुरवात झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी अशासंदर्भी दावा केला होता.
पुणे महापालिकेतील भाजपच्या विद्यमान नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजय सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्यासोबतच भाजपचे अजून वीस ते पंचवीस नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सुत्रांनी सांगितले.
शिवाय या बैठकीत अजित पवार यांनी शाळांबाबतचा देखील महत्वाचा निर्णय घेतला. पुण्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे पहिले ते आठवीचे वर्ग पूर्वरत सुरू करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. लसीकरणाचा टप्पा देखील योग्यरित्या नित्यनियमाअंतर्गत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम