‘ॲनिमल’ चा फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । १ जानेवारी २०२३ । येणाऱ्या वर्षातील रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाकडून सगळ्यांनाच आशा आहेत. ‘ॲनिमल’ च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये रणबीर कपूर त्याच्या सर्वात ‘हिंसक’ अवतारात दिसत आहे.

चॉकलेट बॉय रणबीरचा हा डेंजर अवतार पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. या पोस्टरमध्ये रणबीर पांढऱ्या कपड्यात दिसत आहे, आणि त्याचा पांढरा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला आहे, हातावर जखम आहे, शिवाय त्याच्या काखेत एक कुऱ्हाड दिसत आहे जी रक्ताने माखलेली आहे. वाढलेली दाढी आणि केस, रक्ताने माखलेले हात अशा डॅशिंग अवतारातही रणबीर पोस्टरवर सिगारेट शिलगवताना दिसत आहे.
‘अ‍ॅनिमल’मधला रणबीर कपूरचा अवतार पाहून तो या चित्रपटातून त्याच्या ‘चॉकलेट बॉय’ या भूमिकेतून बाहेर येईल असं वाटतंय. आत्तापर्यंत बहुतेक चित्रपटांमध्ये रणबीर रोमँटिक भूमिकेत दिसला होता, मात्र ‘अ‍ॅनिमल’मध्ये तो काहीतरी वेगळे करताना दिसणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी शेअर केलेला ‘अ‍ॅनिमल’चा अनाउंसमेंट व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होते की ही एक वडील आणि मुलाच्या गुंतागुंतीच्या नात्याची कथा असेल. ‘अ‍ॅनिमल’ संपूर्ण भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम