हा काय नंगटपणा लावला आहे या बाईने ; चित्र वाघ उर्फीवर भडकल्या

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर ।३१ डिसेंबर २०२२ । सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद सतत आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशेनमुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. काहीजन तिच्या फॅशनचे कौतुक करतात तर काहीजन तिला ट्रोल करत असतात.

त्याशिवाय अनेकांनी तिच्याविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तिला अनेकजन चांगलं राहाण्याचा सल्लादेखिल देत असतात मात्र, तरिही उर्फी तिच्या फॅशेनमध्ये बदल करत नाही. आता नुकतंच भाजप नेता
चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट उर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. ‘ फेम उर्फी जावेदहिने आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. उर्फीने अनवेकळा वापरण्यात येणाऱ्या वस्तूंपासून कपडे तयार करुन परिधान केले आहेत. असेही म्हणता येईल की,उर्फीने फॅशेनची हद्दच पार केली आहे. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो मात्र, उर्फीने अनेकांना सडेतोड उत्तर देऊन शातं केले आहे.

नुकतंच भाजप पक्षाच्या नेता चित्रा वाघ यांनी आपल्या आधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरुन ट्वीट शेअर करत उर्फीच्या कपड्यांवर संताप व्यक्त केला आहे. त्याशिवाया त्यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवत आहे.”

गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यानी राहुल गांधी यांना ट्रोल करण्यासाठी उर्फीच्या नावाचा उल्लेख केला होता. या ट्वीटनंतर उर्फी चांगलीच भडकली होती. या ट्वीटनंतर उर्फीने देखिल खोचक शब्दामध्ये प्रतिउत्तर देत ट्वीट शेअर केलं होतं. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता. उर्फीच्या या भूमिकेनंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम