सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र ३ रुपयाने वाढ
मुंबई चौफेर । ७ एप्रिल २०२२ । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरू असतानाच आज दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज इंधनाचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५.४१ रुपये लिटर आहे. तर डिझेलचे दर ९७.६७ रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये आज पेट्रलचा दर प्रति लिटर १२०.५१ रुपये आहे. तर डिझेल १०४.७७ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर ११०.८५ रुपये एवढा आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या २२ मार्चपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आज इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असून, त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
आज राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १२०.५१ तर डिझेल प्रति लिटर १०४.७७ रुपये आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल ११९.३३ रुपये लिटर तर डिझेल १०२.६५ रुपये लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १२०.११ रुपये लिटर आणि डिझेल १०२.८४ रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे ११९.०७ आणि १०२.६७ एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोल ११९.११ रुपये लिटर तर डिझेल १०१.८३ रुपये आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम