सोन्याचे दर स्थिर; पण चांदीच्या दरात किंचित घसरण
मुंबई चौफेर | ७ एप्रिल २०२२ | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ -उताराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज २२ कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा ४७ हजार ८०० एवढा आहे. तर २४ कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर ५२,१४० रुपये एवढा आहे. चांदीच्या किमतीमध्ये किंचितशी घट झाली असून, आज चांदीचा (silver) भाव ६६,३०० रुपये एवढा आहे. सोन्याच्या दरात प्रत्येक शहरांप्रमाणे थोडा फार बदल होऊ शकतो,
सोन्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गुड रिटर्न्स वेबसाईटकडून प्राप्त माहितीनुसार आज राज्यात सोन्याचा दर प्रति तोळा ४७ हजार ८०० एवढा आहे. तर २४ कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर ५२,१४० रुपये एवढा आहे. पाहुयात प्रमुख शहरातील सोन्याचे दर आज मुंबईमध्ये २२ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७ हजार ८०० इतकी आहे. तर २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ५२,१४० रुपये आहे. पुण्यात २२ कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ४७ हजार ८०५० इतकी आहे. तर २४ कॅरट सोन्याची किंमत ५२,१९० रुपये एवढी आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये २२ कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ४७ हजार ८०५० इतकी आहे. तर २४ कॅरट सोन्याची किंमत ५२,१९० रुपये एवढी आहे. आज चांदीच्या दरात किंचीतशी घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो ६६,३०० रुपये झाले आहेत.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम