राणा लकी सानंदा शॉवर मध्ये मिळणार कोटा येथील शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ७ एप्रिल २०२२ । राजस्थान मधील कोटा हे शहर उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध असून जेईई आणि नीटच्या अभासक्रमासाठी कोटा येथे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून आणि सोबतच विदेशातूनही दरवर्षी जवळपास दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेत असतात. शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी राजस्थान कोटा येथील शिक्षण पॅटर्न नावाजलेल्या पॅटर्न म्हणून जगभरात ओळखला जातो .

कोटा येथे शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला जवळपास एक लाख 40 हजार रुपये फी तसेच विद्यार्थ्यांना राहण्यासाठीचा व जेवणाचा तसेच विद्यार्थी व पालकांना राजस्थान येथे येण्या- जाण्यासाठी अफाट खर्च सोसावा लागतो. शिक्षणासाठी लागणाऱ्या अफाट खर्चामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. शिक्षण क्षेत्रात मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोटा येथील शिक्षकांकडून कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून खामगाव येथील राणा लकी सानंदा एज्युकेशनल शावर ने पुढाकार घेतला आहे . संस्थेने कोटा येथील जगप्रसिद्ध रेजनन्स या संस्थेसोबत टाय-अप करून देत, कोटा येथे लागणाऱ्या फी पेक्षाही कमी फी मध्ये जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी एका कार्यक्रमात दिली.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम