नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनालीनं दिली गुड न्यूज

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । १ जानेवारी २०२३ । मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील नाव कमावले आहे. ‘खेळ संचिताचा’ या मालिकेद्वारे कारकीर्दीला सुरुवात केलेल्या सोनालीने अल्पावधीतच नाव कमावले. आजवर तिने अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आता नुकतीच तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.तिने अजून एक यशाची पायरी चढली असून ही अभिनेत्री आता मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर रिलीज करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत सोनाली म्हणतेय कि, ‘नवीन वर्ष… नवीन प्रवास…नवीन प्रदेश. चित्रपट मध्ये दिग्गज सर सोबत काम करताना माझे नवीन वर्ष खरोखरच आशादायक वाटत आहे.’

सोनालीने ही घोषणा करताच चाहते तसेच तिचे सहकलाकार या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सोनालीला आता मल्याळम चित्रपटात पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर झाले आहे.

सोनाली कुलकर्णी येणाऱ्या काळात मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.

 

 

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम