रुहानिका धवन हिने स्वकमाईतून मुंबईत घेतले कोट्यवधींचे घर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । २ जानेवारी २०२३ । ‘ये है मोहोब्बते’ मधून प्रसिद्धीझोतात आलेली ‘रुही’ म्हणजेच रुहानिका धवन हिने स्वकमाईतून मुंबईत घर विकत घेतल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. यानंतर तिचं सर्वत्र कौतुक होतंय.


‘ये है मोहोब्बते’ फेम रुहानिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. तिने काही फोटो सुद्धा पोस्ट केले आहेत. केवळ १५ वया वर्षी तिने एवढे यश मिळवल्याने तिच्या आई वडिलांना तिचा प्रचंड अभिमान वाटतोय. तिने याचे श्रेय तिच्या आईला दिले आहे. तिने लिहिले, ‘आज मी खूप खूश आहे. नवीन सुरुवात करते आहे. माझ्या अनेक स्वप्नांपैकी आज एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे.माझ्या कमाईतून मी घर घेत आहे. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझ्या आई वडिलांनी नेहमीच मला दिलेल्या पाठिंब्यामुळे मला आज हे स्वप्न पूर्ण करता आलं. माझी आई माझ्यासाठी आयुष्यातली एक जादूगारच आहे. तिने योग्य गुंतवणुक केली आणि पैसे डबल केले. देवाला आणि तिलाच माहित की हे तिला कसं जमतं. ही तर फक्त सुरुवात आहे. मी आणखी मोठे स्वप्न पाहत आहे. जर मी हे करु शकते तर तुम्ही का नाही. स्वप्न बघत राहा, त्या दिशेने प्रयत्न करा एक दिवस ते नक्की पूर्ण होतील.

रुहानिकाने ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेत रुही ही बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. रुहानिका तिचा अभ्यास आणि शूट दोन्ही अगदी यशस्वीपणे करते. तसेच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

 

 

 

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम