महावीर जन्मकल्याणाक निमित्त रविवारी विश्वशांती दौडचे आयोजन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती तर्फे महावीर जन्मकल्याणाक निमित्त रविवार, दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६.३० वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नवली चौक जळगाव येथून विश्वशांती दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वशांती दौड भाऊंचे उद्यान- आकाशवाणी चौक- स्वतंत्र स्वतंत्र चौक- चिमुकले राम मंदिर- स्वतंत्र चौक- आकाशवाणी चौक मार्गे काव्यरत्नवली चौक येथे समाप्त होणार आहे. सहभागी होणाऱ्या नागरिकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विश्वशांती दौड साठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, जैन इर्रीगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, आयुक्त सतीश कुलकर्णी, आमदार सुरेश भोळे, नितीन लद्धा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या विश्वशांती दौड मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांनी केले आ

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम