मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार रविवारी पोहरादेवीत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । इतर मागास बहुजन कल्याण विभाग,खार जमिनी विकास,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रविवार १० एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ०९.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून हेलिकॉप्टरने पोहरादेवीकडे प्रयाण.सकाळी १०.३० वाजता पोहरादेवी हेलिपॅड येथे आगमन.सकाळी ११ वाजता हेलिपॅड येथून तपस्वी रामराव महाराज यांचे संस्थान येथे आगमन व राखीव. सकाळी ११.३० वाजता तपस्वी रामराव महाराज संस्थान येथे आगमन व आयोजित रामनवमी कार्यक्रमास उपस्थिती. तसेच संत सेवालाल महाराज व माता जगदंबा देवी देवस्थानला भेट.दुपारी १ ते २ राखीव, दुपारी २ वाजता तपस्वी रामराव महाराज संस्थान पोहरादेवी येथून हेलिपॅडकडे प्रयाण,दुपारी २.१५ वाजता पोहरादेवी हेलिपॅड येथे आगमन, दुपारी २.३० वाजता पोहरादेवी हेलिपॅड येथुन हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम