महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा

महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम
मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । १० एप्रिल २०२२ रोजी महावीर जयंतीनिमित्त विश्वशांती दौड’ सकाळी ६:३० वाजता भाऊंच्या उद्यान येथून चिमुकले राम मंदिरापर्यंत “विश्वशांती दौंड” आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये जळगावकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. जय आनंद ग्रुप, युवा शक्ती फाउंडेशन यांचा या विश्वदौडमध्ये महत्त्वाचा सहभाग असणार आहे. सकाळी ७.०० ते ८.०० दरम्यान काव्यरत्नावली चौक येथे महावीर ज्वेलर्स पुरस्कृत जितो लेडीज विंगतर्फे ‘जीवदया संस्कार सामग्री वितरण’चा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.०० वाजता स्वाध्याय भवन येथे समरथ महिला मंडलच्या वतीने “भगवान महावीर यांचे ३६ बोल” तर दुपारी ३.४५ ला “लुक एन लर्न” तर्फे अनोखी अंताक्षरी हा भक्तिगीता वर आधारित कार्यक्रम आहे. दुपारी ४.०० ते ५.०० वाजेच्या दरम्यान महाजनवाडी नवी पेठ येथे नूतन भावना मंडळ तर्फे “शाश्वत नवकार मंत्र जप” कोठारी मंगल कार्यालय येथे ४.०० ते ६.३० दरम्यान “फन फेअर” कार्यक्रम होणार आहे.

स्वाध्याय भवन येथे सकाळी ९.०० ते १०.०० दरम्यान प.पु. संवेगनिधीजी म. सा. यांचे ‘बेहतर जिंदगी के लिये नयी दिशा’ यांचे प्रवचन होईल. या कार्यक्रमासाठी श्री श्वेतांबर मूर्तिपूजक संघ जळगाव यांचे सौजन्य लाभले. दुपारी २.०० वाजता अरिहंत मार्गी महिला मंडळातर्फे ‘भजन स्पर्धा’, सायंकाळी ५.००वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथून सद्भावना रॅली निघेल

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम