पर्यावरण, आरोग्य विषयावर आयएमएतर्फे जनजागृती रॅली

बातमी शेअर करा
मुंबई चौफेर | ९ एप्रिल २०२२ | जळगाव  येथील इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव शाखेतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त पर्यावरण व आरोग्य याविषयी रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली.
आयएमएचे अध्यक्ष डॉ.दीपक आठवले, सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे, समन्वयक डॉ.पंकज शाह, डॉ.सरिका पाटील यांच्या नेतृत्वात आयएमए सभागृहापासून रॅलीला प्रारंभ होवून महात्मा गांधी उद्यान येथे समारोप करण्यात आला.
समारोपात बालरोग तज्ज्ञ डॉ.हेमंत पाटील यांनी पर्यावरण व आरोग्य याविषयावर व्याख्यानात मार्गदर्शन केले. रॅलीत आयएमएचे पदाधिकारी सभासद आदी ६० व्यक्तींचा सहभाग होता. रॅलीस जिल्हा पोलीस दल व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम