नाशिकमध्ये पेट्रोल पंपचालकांना नोटीस; हेल्मेटसक्तीचा आता कोर्टात लागणार निकाल

बातमी शेअर करा

नाशिकमध्ये पेट्रोल पंपचालकांना नोटीस; हेल्मेटसक्तीचा आता कोर्टात लागणार निकाल
मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अतिशय लावून धरलेल्या तरीही आतापर्यंत काहीही हाती न लागलेल्या हेल्मेटसक्ती प्रकरणाचा तिढा आता पुन्हा एकदा कोर्टात जाणारय. पोलीस आयुक्तांच्या आदेशानानुसार शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांनी पेट्रोल पंपचालकांना नो हेल्मेट, नो पेट्रोल असे धोरण राबवण्याच्या नोटीस दिल्यात. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आपल्या पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्याचे आढळले आहे. हेल्मेट घातलेल्या दुचाकी चालकाला पेट्रोल देण्यात यावे. अन्यथा या पुढे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ (ब) (१) नुसार कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, यावरून पुन्हा एकदा पेट्रोल पंपचालक आणि पोलीस आयुक्त असा नवीनच संघर्ष शहरात पाहायला मिळणार आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार पेट्रोल पंपचालकांनी केला आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पाठविलेल्या नोटीसनंतर पेट्रोल पंपचालकांची एक ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला. यापूर्वीही हे प्रकरण कोर्टात गेले होते. तेव्हा पोलीस आयुक्तांनी सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, पंपचालकांना नोटीस देताना पोलीस आयुक्तांनी सुनावणीही घेतली नाही. याबद्दलही पंपचालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम