सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सलग तीसऱ्या दिवसी इंधनाचे दर स्थिर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार इंधनाच्या दारत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घेऊयात आजचे राज्यातील पेट्रोल, डिझेलचे भाव. राज्याची राजधानी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर १२०.५१ रुपये तर डिझेल प्रति लिटर १०४.७७ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे १२०.७७ व १०२.९७ रुपये एवढी आहे. पुण्यात देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून, पेट्रोल प्रति लिटर १२०.१३ तर डिझेलचा दर १०२.८३ रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर १२१.१४ रुपये तर डिझेल प्रति लिटर १०३.८१ रुपये आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल १२०.५१ तर डिझेल १०३.१९ रुपये लिटर आहे.

दिलासादायक बातमी म्हणजे कच्च्या तेलाच्या दरामध्ये देखील घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर तब्बल पंधरा दिवसांनंतर १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण हे देखील देशात सलग तीन दिवस इंधनाच्या किमती स्थिर राहण्याचे कारण असू शकते. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर पडल्याचे दिसून येत आहे. जवळपास सर्वच वस्तुंमध्ये दरवाढ झाली असून, महागाईने उच्चांक गाठला आहे.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम